मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याने पालकमंत्री नियुक्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली असून यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही सांगितले. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....