Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याने पालकमंत्री नियुक्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली असून, यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही सांगितले. आजवर राज्यातील एकाही मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली नव्हती. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी आतापर्यंतची परंपरा मोडीत काढत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारण्याचे संकेत दिले आहे.
मिळालेल्या गेल्या अडीच वर्षांपासून जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे होती. पण त्यांच्या या कामावर त्यांच्या विरोधकांनी नव्हे तर भाजपच्या मित्रपक्षांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे फडणवीस यांच्या विधानावरून विरोधकांकडून पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले होते.
बुधवारी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवावे, अशी मागणी केली होती.