कोल्हापूर : पंचगंगा नदीत मिनी बस कोसळली, १३ ठार

Webdunia
शनिवार, 27 जानेवारी 2018 (12:08 IST)

कोल्हापूरच्या  शिवाजी पुलावरुन मिनी बस 100 फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर आहेत. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. मृतांमध्ये पुण्यातील बालेवाडी आणि पिरंगुट इथल्या लोकांचा समावेश आहे. 26 जानेवारीला लागून आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुट परिसरात राहणारे भरत केदारी , संतोष वरखडे , दिनेश नांगरे यांचे कुटुंबीय कोकण पर्यटनासाठी 17 सीटर मिनी ट्रॅव्हलरमधून निघाले होते. त्यादरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पुलाचा दगडी कठडा तोडून बस थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली. सकाळी हे कुटुंबीय गणपतीपुळे इथून देवदर्शन आटोपून कोल्हापूरला निघाले होते. 

संबंधित माहिती

पुढील लेख