राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. चारा घोटाळ्यातील तिसऱ्या प्रकरणातही त्यांना दोषी ठरवण्यात आलं. चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवल आहे. चारा घोटाळ्यातील हे तिसरं प्रकरण आहे. या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. मिश्रा यांनाही पाच वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर ध्रुव भगतला 3 वर्षांचा सश्रम कारावास आणि 50 हजार रुपये दंड झाला आहे.