राज्य शासनाने हेलिपॅड बनवण्यासाठी धोरण तयार केलं आहे. केंद्रीय नागरी विमान महासंचालनालयाच्या नियमांवर आधारित धोरण तयार करण्यात आलं आहे. सरकारच्या या धोरणानुसार सर्व जिल्ह्यात कायमस्वरुपी हेलिपॅड उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करून अहवाल शासनाला सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या अपघातांनंतर सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.