छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

Webdunia
शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (14:41 IST)
मराठा आरक्षणाला विरोध करणारे आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती स्वतः छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना दिली. भुजबळांच्या नाशिकच्या कार्यालयात धमकीचे पत्र आले  असून तुम्हाला जीवे मारण्यासाठी सुपारी घेतली आहे असा आशयाचे पत्र त्यांना मिळाले आहे.  
 
भुजबळांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या कार्यालयात त्यांना हे धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यांना ठार मारण्यासाठी सुपारी घेतल्याचं मारेकऱ्यांनी सांगितलं असून त्यांना मारण्याचा कट कुठे रचला कधी रचला हॉटेलचे नाव सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यांनी पोलिसांना सर्व माहिती दिली असून घाबरून घरी बसून चालणार नाही. जे  काय व्हायचं आहे ते होणार. पोलीस या धमकी देणाऱ्याचा शोध लावत आहे. या पूर्वी देखील मला अनेकदा धमकी दिली आहे. आता सगळी माहिती पोलिसांना दिल्यावर सगळं त्यांच्यावर सोडायचं. असे भुजबळ म्हणाले. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

पुढील लेख