आयपीएल 2025 हंगामातील 64 वा लीग सामना गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. गुजरातने आतापर्यंत लीग टप्प्यात 12 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 9 सामने जिंकून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. उर्वरित दोन्ही सामने जिंकून टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
गुजरात आणि लखनौ यांच्यात आतापर्यंत 6 सामने झाले आहेत, त्यापैकी गुजरात संघाने 4 सामने जिंकले आहेत तर लखनौ संघाने २ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. दोन्ही संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर यापूर्वी एकदा आमनेसामने आले होते आणि तो सामना गुजरात टायटन्सने जिंकला होता.
संभाव्य ड्रीम 11 संघ
जोस बटलर (कर्णधार), निकोलस पूरन, मिचेल मार्श, साई सुदर्शन, शुभमन गिल, शेरफेन रदरफोर्ड, एडन मार्कराम, प्रसिध कृष्णा (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, रशीद खान, साई किशोर.
गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग 11:
शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रशीद कृष्णा