आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) वार्षिक उत्पन्नाच्या 75 टक्के रक्कम भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या पाच कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये समान प्रमाणात विभागली जाते. म्हणजेच, प्रत्येक देशाला 15 टक्के महसूल मिळतो. उर्वरित 25 टक्के रक्कम असोसिएट सदस्य देशांमध्ये विभागली जाते.
हे उत्पन्न प्रसारण हक्क (टीव्ही आणि डिजिटल), प्रायोजकत्व करार आणि तिकीट विक्री अशा विविध स्रोतांमधून येते. या आशिया कपमधून पीसीबीला अंदाजे 12 ते 16 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील असा अंदाज होता. अशा परिस्थितीत, जर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली तर ते त्यांच्यासाठी मोठा आर्थिक धक्का ठरू शकते.