प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 49 षटकांत सात विकेट्सच्या मोबदल्यात 331 धावा करून सामना जिंकला. कर्णधार एलिसा हिलीने त्यांच्याकडून शानदार कामगिरी केली. तिने 107 चेंडूत 142 धावांची दमदार खेळी करत विजय निश्चित केला. या सामन्यात भारताकडून श्री चरणीने तीन विकेट्स घेतल्या तर अमनजोत कौर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने सहा चेंडू शिल्लक असताना 331 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. WODI इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. यापूर्वीचा विक्रम 302 धावांचा होता, जो 2024 मध्ये श्रीलंकेच्या महिलांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गाठला होता.
चार सामन्यांपैकी तीन विजयांसह, ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषक गुणतालिकेत सात गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दरम्यान, इंग्लंड पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात चार गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट 0.682 आहे. दक्षिण आफ्रिका चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे..
कर्णधार एलिसा हीली (142) हिने शानदार शतकासह तिच्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हीलीने सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत क्रांती गौडने टाकलेल्या षटकात एक षटकार आणि तीन चौकार लगावत सामन्याचा मार्ग बदलला. हीलीने फक्त 35 चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले, जे सध्याच्या विश्वचषकातील सर्वात जलद अर्धशतक आहे. त्यानंतर तिने फक्त 84चेंडूत तिच्या कारकिर्दीतील सहावे शतक पूर्ण केले.