भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधानानाने रविवारी एक मोठा टप्पा गाठला, एका कॅलेंडर वर्षात 1000एकदिवसीय धावा पूर्ण करणारी ती पहिली महिला फलंदाज ठरली. महिला विश्वचषकात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करत आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
स्मृती मानधना आणि प्रतीका रावल दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांनी फक्त 21 डावांमध्ये 14 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. अंजुम चोप्रा आणि मिताली राज तिसऱ्या स्थानावर आहेत, त्यांनी 57 डावांमध्ये13 वेळा भागीदारी केली आहे, तर मिताली राज आणि पूनम राऊत यांनी 34 डावांमध्ये 13 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे.
दोन्ही संघांसाठी प्लेइंग 11 :
भारत: प्रतीका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी.
ऑस्ट्रेलिया: एलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), फोबे लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग, मेगन शट.