ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर तिने हे यश मिळवले. मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मंधाना हिने 63 चेंडूत 58 धावा केल्या, परंतु तिचे प्रयत्न व्यर्थ गेले कारण ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा सहज पाठलाग केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकापूर्वी अव्वल क्रमांकाच्या मानांकनामुळे मंधानाचा आत्मविश्वास वाढेल. या अर्धशतकामुळे तिने सात रेटिंग गुण मिळवले आणि इंग्लंडच्या नॅट सायव्हर-ब्रंटपेक्षा चार गुणांनी पुढे गेली, जी आता दुसऱ्या स्थानावर आहे. मानधनाचे आता 735 रेटिंग गुण आहेत, तर सायव्हर-ब्रंटचे 731 आहेत. मंधानाने 2019 मध्ये पहिल्यांदा नंबर वन रँकिंग मिळवले होते आणि आता 2025 मध्ये ती दुसऱ्यांदा अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी तीन स्थानांनी पुढे सरकून पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. महिला फलंदाजांमध्ये अॅनाबेल सदरलँड (चार स्थानांनी पुढे सरकून) आणि फोबी लिचफिल्ड (13 स्थानांनी पुढे सरकून) संयुक्तपणे 25 व्या स्थानावर पोहोचल्या आहेत. या दोघांनीही या सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत . पहिल्या एकदिवसीय सामन्यात विकेट घेणारी भारताची फिरकी गोलंदाज स्नेह राणा पाच स्थानांनी प्रगती करत13 व्या स्थानावर आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.