एवढेच नाही तर या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत संघाचे तिन्ही फलंदाज टॉप 5 मध्ये आहेत.साईने या वर्षी आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 509 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 46.27 आहे आणि तो 153.31 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. शुभमन गिलबद्दल बोलायचे झाले तर, त्याने या वर्षी 11 सामने खेळून आतापर्यंत 508 धावा केल्या आहेत. शुभमन गिलची सरासरी 50.80 आहे आणि तो 152.55 च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे.