भारत आणि पाकिस्तान सीमेवरील तणाव संपल्यानंतर IPL 17 मे पासून पुन्हा सुरू
मंगळवार, 13 मे 2025 (11:10 IST)
IPL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव संपल्यानंतर, पुन्हा एकदा आयपीएल सुरू करण्याची योजना आखली जात आहे. १७ तारखेपासून पुन्हा एकदा आयपीएल सुरू होत आहे. अशी माहिती समोर आली आहे.
आयपीएल २०२५ पुन्हा एकदा सुरू करण्याचे नियोजन अंतिम झाले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सीमा तणाव संपल्यानंतर, आज आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल २०२५ पुन्हा एकदा १७ मे पासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३ जून रोजी होईल.
तसेच बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने हंगामाची सुरुवात होईल. तर भारत आणि पाकिस्तानमधील सीमापार तणाव वाढल्यानंतर ही लीग एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती, त्या दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग तात्पुरती पुढे ढकलण्यात आली होती परंतु आता ती १७ मे रोजी पुन्हा सुरू होणार आहे.