प्रत्युत्तरात, न्यूझीलंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा पाऊस परतला आणि डीएलएस पद्धतीनुसार त्यांना 44 षटकांत 325 धावांचे नवे लक्ष्य देण्यात आले. न्यूझीलंड त्यांच्या निर्धारित षटकांत आठ गडी बाद 271 धावाच करू शकला. ब्रुक हॅलिडेने 81 धावा केल्या आणि इसाबेल गेजने नाबाद65 धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंग आणि क्रांती गौरने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर स्नेह राणा, श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि प्रतिका रावल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने न्यूझीलंडसमोर 341 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. भारतीय सलामी जोडी स्मृती मानधना (109) आणि प्रतिका रावल (122) यांनी पहिल्या विकेटसाठी 212 धावांची विक्रमी भागीदारी केली, जी महिला विश्वचषक इतिहासातील भारताची सर्वोच्च भागीदारी ठरली.
तिने 55 चेंडूत नाबाद 76 (11चौकार) धावा केल्या आणि संघाला 49षटकांत तीन बाद 340 धावांपर्यंत पोहोचवले. पावसामुळे 90 मिनिटे खेळ थांबवण्यात आला आणि प्रत्येकी 49 षटकांचा खेळ करण्यात आला. तरीही, भारतीय फलंदाजांनी धावगती कायम ठेवली आणि स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
न्यूझीलंडला 44 षटकांत 8 बाद 271 धावा करता आल्या आणि त्यांना 53 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय गोलंदाजांमध्ये रेणुका सिंग आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर स्नेह राणा, दीप्ती शर्मा, श्री चरणी आणि प्रतीका रावल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.