ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत नऊ विकेट्समध्ये २४४ धावा केल्या. सलामीवीर टॅमी ब्यूमोंटने १०५ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ७८ धावा केल्या. एलिस कॅप्सी (३८) आणि चार्ली डीन (२६) यांनीही उपयुक्त योगदान देऊन संघाचा धावसंख्या २०० च्या पुढे नेली.
२४५ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ६८ धावांत चार विकेट गमावल्या. फोबी लिचफिल्ड (१), जॉर्जिया वॉल (६), अॅलिसा पेरी (१३) आणि बेथ मूनी (२०) बाद झाल्या. अशा गंभीर परिस्थितीत सदरलँड आणि गार्डनर यांनी १८० धावांची शतकी भागीदारी केली आणि संघाला ४०.३ षटकांत २४८ धावांपर्यंत पोहोचवले. अॅनाबेल सदरलँडने ११२ चेंडूत नाबाद ९८ धावा केल्या, त्यात नऊ चौकार आणि एक षटकार मारला. अॅशले गार्डनरने ७३ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या, ज्यामध्ये १६ चौकार मारले.