अनेक ठिकाणी खोटे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत- छगन भुजबळ

रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (11:18 IST)
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा मनोज जरांगे यांना दिल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. मात्र याला मंत्री अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यासह ओबीसींकडून विरोध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच त्यांनी गौप्यस्फोट केला की, ओबीसीच्या पहिल्या सभेआधी मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

मराठा आरक्षण अध्यादेशानंतर पहिल्यांदाच ओबीसींचा महाएल्गार मेळावा आज अहमदनगरमध्ये पार पडत आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, मात्र त्यांना प्रश्न करायचा आहे. वाशीमध्ये तुम्ही जाहीर केले की, मी शपथ घेतली होती ती आज मी पूर्ण केली. अशावेळी मला प्रश्न पडतोय की, शपथ पूर्ण झाली तर आयोगाचा सर्व्हे कशाला? तपासणी करणारे लोक स्वत:हून माहिती भरत आहेत. सर्व खोटं खोटं सुरू आहे. मराठा समाजाला जर आरक्षण मिळाले तर हे सर्व कशासाठी? अनेक ठिकाणी खोटे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत. 360 कोटी रुपये खर्च यासाठी करत आहात का? असे प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारले आहेत.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती