मराठा आरक्षण : मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार

सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (12:26 IST)
मराठा आरक्षण मिळावं म्हणून लढा करणारे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू होण्यासाठी पुन्हा आक्रमक झाले असून येत्या 10 फेब्रुवारी पासून ते आमरण उपोषणाला बसणार आहे. असं मनोज जरांगे पाटीलांनी जाहीर केलं आहे. 

राज्य सरकार ने सगे सोयरे बाबत अध्यादेश काढला. या निर्णयाचा फायदा मराठा समाजाच्या बांधवाना होणार आहे. याचा श्रेय काही सत्ताधारी लोक सोशल मीडियावर घेत आहे. त्यांना आवाहन करतो याचे श्रेय घेऊ नका. मराठा आंदोलनामुळे सरकारच्या हालचाली सुरु झाल्या अधिसूचना काढण्यात आल्या.

येत्या 15 फेब्रुवारी रोजी अधिवेशनात कायदा करायचा आहे. सरकारच्या निर्णयाचा फायदा 60 लाख मराठा बांधवाना होणार आहे. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांना सर्वांना आरक्षण मिळणार आहे. गेल्या 75 वर्षात जे झालं नाही ते आज झालं काही नेते यावर जळत आहे. काही जण सरकारची सुपारी घेत सोशल मीडियावर ट्रॅप करत आहे. त्यांना पैसे व पद हवे आहे. मी ट्रॅपला अजिबात घाबरत नाही. असं मनोज जरांगे  यांनी म्हटलं आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती