8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबियातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणात पूर्णशुल्क माफी देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार ने घेतला असून पूर्ण शैक्षणिक वर्षांसाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. राज्यातील मुलींचे शिक्षण जास्त प्रमाणात व्हावे या साठी शिंदे सरकार कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला राज्यपाल रमेश बैस हे देखील उपस्थित होते.