Mumbai News : थोरियम अणुभट्टीच्या विकासासाठी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आणि रशियन सरकारी मालकीची कंपनी रोसाटॉम आणि थोरियम इंधनासह स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर यांच्यात हा करार झाला.
या करारात महाराष्ट्रात थोरियम अणुभट्टीचा संयुक्त विकास, अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (AERB) सुरक्षा निकषांनुसार त्याचे व्यापारीकरण आणि 'मेक इन महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत थोरियम अणुभट्टीसाठी असेंब्ली लाइनची स्थापना यांचा समावेश असेल.
तसेच हा उपक्रम भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबविला जाईल आणि अणुऊर्जा नियामक मंडळ आणि महाराष्ट्र परिवर्तन संस्था (मित्रा) धोरणात्मक सहाय्य करतील. यासाठी एक विशेष संयुक्त कार्यगट तयार केला जाईल आणि त्यात महानिमती, मित्रा, रशियाच्या रोसाटॉम आणि ग्लोबल टेक्नॉलॉजी अलायन्सचे प्रतिनिधी सहभागी होतील.