लातूरमध्ये विहिरीत पडून भाऊ आणि बहिणीचा दुर्देवी मृत्यू

शुक्रवार, 11 एप्रिल 2025 (19:54 IST)
लातूर येथे घराजवळ खेळत असताना विहिरीत पडून 3 वर्षाचा मुलाचा आणि तिच्या 6 वर्षाच्या बहिणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 10 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता तळेबुरहान परिसरात घडली आहे. 
ALSO READ: सोलापुरात शाळकरी मुलींसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या 68 वर्षीय वृद्धाला अटक
अलिना शेख वय वर्ष सहा आणि तिचा तीन वर्षाचा भाऊ उस्मान हे दोघे घराजवळ खेळत असताना विहिरीत पडले. त्यांना विहिरीत पडताना पाहून त्यांचा आठ वर्षाचा भाऊ घाबरला आणि त्याने कुटुंबियांना सदर माहिती दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली शेजारच्यांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य सुरु केले. 
ALSO READ: लातूर : ड्रग्ज फॅक्टरी टाकलेल्या छाप्यात १७ कोटी रुपयांचा माल जप्त, ७ आरोपींना अटक
तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांचे मृतदेह झाडाला बांधलेल्या दोरीच्या साहाय्याने काढण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले आहे. मयत मुलांचे वडील आईस्क्रीम विक्रेता आहे. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलमध्ये भीषण आग

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती