हिवाळा सुरु झाला असून राज्यात दिवाळीपासून थंडीची चाहूल लागत आहे. हवामान थंड होऊ लागले आहे. सध्या राज्यात कोरडे वातावरण आहे. येत्या तीन दिवस राज्यातील बहुतेक भागांत तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसून 23 नोव्हेंबर पर्यंत किमान तापमानात घट होईल. तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा जाणवणार आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढणार. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल. तसेच मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते त्यामुळे 24 नोव्हेंबर रोजी मध्यमहाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी धुक पडेल.