या बाबत पोलीस शिपाई प्रशांत साखरे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, निलेश घायवळ तसेच समाज माध्यमातील घायवळ खाते चालवणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. समाज माध्यमातून दहशत माजवणारी चित्रफीत प्रसारित करत गुन्हेगारी टोळीचे उद्दात्तीकरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घायवळ याच्या विरुद्ध दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्या प्रकरणी ( Nilesh Ghaywal)कोथरूड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला घायवळ हा युरोपात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याला ब्लू कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे.