हवामान खात्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिला आहे. सध्या राज्यात ढगाळ आकाश असून हवामान उष्ण आणि दमट आहे. पण हवामान खात्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिला आहे. तसेच आज पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शनिवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
रविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.