Maharashtra Weather : राज्यात तापमानात घट,अनेक जिल्ह्यात थंडीची चाहूल

सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (10:23 IST)
Maharashtra Weather: ऑक्टोबर महिना संपत आला असून ऑक्टोबर महिन्यात उकाड्याने नागरिकांना हैराण केले .आता राज्यात तापमानात घट झाली असून राज्यात थंडीची चाहूल लागत आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिह्यात तापमानात घट होऊन थंडी जाणवू लागली आहे. 

राज्यात पुणे, सांगली, सातारा , महाबळेश्वर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर आणि मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यात उकाडा जाणवत होता. तापमानात वाढ झाली होती. आता या जिल्ह्यात तापमानात घट झाली असून वातावरण थंड झाले असून थंडी जाणवत आहे. तापमान कमी झाले असून काही भागात नागरिक सकाळी शेकोट्या पेटवत आहे. तसेच सकाळी फिरायला जाणारे नागरिकांनी गरम उबदार कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे. येत्या नोव्हेंबर मध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती