कोटीचा रेल्वेच्या मशीनचा पार्ट चोरणारे 2 संशयित इगतपुरीतून जेरबंद

सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (08:08 IST)
भारतीय रेल्वे टनेल कामासाठी लावलेला मशीनचा 1 कोटी रुपये किमतीचा पार्ट चोरीस गेलेला होता. याबाबत बिहार राज्यातील राजोली जि. नवादा पोलीस ठाण्यात 21 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात राजोली पोलीस ठाण्याचे प्रभारी त्यांच्या पथकासह संशयित आरोपीच्या शोधासाठी इगतपुरी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी केलेल्या लेखी विनंतीवरून गुन्ह्यातील सहभागी निपुरा मनोरंजन राय (वय 30), नयन नरेश राय (वय 23) ह्या 2 संशयित आरोपींना इगतपुरी पोलिसांनी बिहार पोलिसांच्या स्वाधीन केले.
 
इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पोलीस पथकाने कसोशीने शोध घेऊन ही कामगिरी केली. याबद्धल नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले आहे. गुन्ह्यातील चोरी केलेला 1 कोटी किमतीचा पार्ट पश्चिम बंगाल राज्यातील सिलीगुडी येथे पाठविला असल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली असून त्याबाबत खात्री झाली आहे. चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यासाठी बिहार पोलिसांचे दुसरे पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झालेले आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती