भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ४ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. साउथहॅम्प्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला २५९ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी ४८.२ षटकांत पूर्ण केले.
इंग्लंड दौऱ्यावर टी-२० मालिका जिंकल्यानंतर, भारतीय महिला संघाने आता तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. साउथहॅम्प्टनमधील रोझ बाउल मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिला सामना ४ विकेट्सने जिंकून टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान इंग्लंडने ५० षटकांत ६ विकेट्स गमावून २५८ धावा केल्या, त्यानंतर भारतीय संघाने ४८.२ षटकांत ६ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले आणि मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. या विजयासह टीम इंडियाने पहिल्यांदाच एक ऐतिहासिक कामगिरी केली.
तसेच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, भारतीय महिला संघ गेल्या काही काळापासून एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे, ज्यामध्ये त्यांनी गेल्या १२ पैकी ११ एकदिवसीय सामने जिंकले आहे.