आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. अनेक खाजगी दवाखाने बंद असल्यानं नागरिकांना नेहमीच्या उपचारांसाठी अडचणी येत होत्या. आता www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला भेट देऊन नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला घेता येईल, असे टोपे म्हणाले.
केंद्र आणि राज्याच्या आरोग्य विभागांकडून निशुल्क ई-ओपीडी चालवली जाणार आहे. सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड या वेळेत ही ऑनलाइन ओपीडी चालू असेल. या ई-ओपीडीच्या माध्यमातून रुग्णांना राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईलच्या माध्यमातून कुठल्याही आजारावर सल्ला घेता येणार आहे.