आज राज्यात ३६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३, ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे.
झालेल्या मृत्यूंपैकी २३ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.