छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती, परंतु ती जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही. शिवाय, त्यानंतर राज्यसभेसाठी भुजबळ इच्छुक होते, परंतु तिथंही त्यांच्याऐवजी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली.यामुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीत भर पडल्याचं बोललं गेलं आणि आता तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशा चर्चा सुरू झाल्यात.त्यांनी मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊतांशी भेट घेतली आणि ते ठाकरे गटात येणार अशी माहिती सूत्रांनी दिली होती. अशी चर्चा सुरु आहे.
मात्र या चर्चांना छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, मी कुठल्याच पक्षात जाणार नाही, कोणालाही भेटलेलो नाही.मान्य आहे की मी लोकसभा उमेदवारीवरून नाराज होतो पण राजकारणात नाराज होऊन चालणार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशीही चर्चा झाली होती. त्यांना माहिती आहे.
छगन भुजबळ हे सध्या ओबीसींसाठी आरक्षण करणारे नेता लक्ष्मण हाकेच्या संपर्कात आहे. ते म्हणाले. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे. ओबीसीतूनच हवं असेल तर त्याला आमचा विरोध आहे. ते आंदोलन करू शकतात, तर आम्हीही करू शकतो. आमचे नेतेही करू शकतात.