अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात जावे-वर्षा गायकवाड

शुक्रवार, 14 जून 2024 (18:08 IST)
शिखर बँक गैरव्यवहारप्रकरणी अजित पवार यांना क्लिन चीटवर अण्णा हजारेंचा आक्षेप आहे. काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचे विधान केले आहे. 

त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला नाकारले असून त्यांचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर पुन्हा प्रश्न होणार आहे.पण भाजपचा पराभव महाराष्ट्रात आणि युपीमध्येच नाही तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात देखील झाला. 
 
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जसा पराभव झाला, तसाच प्रकार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

अण्णा हजारे यांच्या याचिकेबाबत त्या म्हणाल्या की, अण्णा हजारे यांनी आवाज उठवायला उशीर केला. पण आक्षेप नोंदवला ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी असाच आवाज उठवत राहावे अशी माझी इच्छा आहे. अण्णा हजारे हे महात्मा गांधींना फॉलो करतात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात न्यायालयात जावे अशी माझी मागणी आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यावर वर्षा म्हणाल्या की, त्यांचे वक्तव्य आत्मप्रेरणेसाठी चांगले आहे पण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यांनी काहीही केले तरी विजय महाआघाडीच्या होणार.

Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती