इराणमध्ये 2 न्यायाधीशांची गोळ्या झाडून हत्या

Webdunia
रविवार, 19 जानेवारी 2025 (10:40 IST)
इराणची राजधानी तेहरानमध्ये दोन न्यायाधीशांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे घबराट पसरली आहे. एका व्यक्तीने दोन प्रमुख कट्टरवादी न्यायाधीशांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना शनिवारी घडली. सरकारी प्रसारमाध्यमातून ही माहिती मिळाली. देशातील न्यायव्यवस्थेवरील हा दुर्मिळ हल्ला आहे. 
 
गोळीबारात न्यायाधीश मौलवी मोहम्मद मोगिसेह आणि न्यायाधीश अली रजनी यांचा मृत्यू झाल्याची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने वृत्त दिले आहे. 'आयआरएनए'ने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात न्यायाधीशांचा एक अंगरक्षकही जखमी झाला आहे.
 
ज्या न्यायाधीशांवर गोळी झाडली गेली, त्यापैकी एकाच्या हत्येचा प्रयत्न सुमारे २५ वर्षांपूर्वी झाला होता, असे सांगण्यात येत आहे.
 
1999 मध्ये न्यायाधीश रजनी यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला, पण तो प्रयत्न फसला. दोन्ही न्यायमूर्ती कार्यकर्त्यांवर खटला चालवण्यासाठी आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी ओळखले जात होते. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

पुढील लेख