मिळालेल्या माहितनुसार महाराष्ट्राची गौरवशाली गाथा दाखवणाऱ्या 'गौरवशाली महाराष्ट्र दर्शन' या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवारी मंत्रालयात करण्यात आले. यावेळी मंत्री शेलार यांनी खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या मंत्रालयातील टीमने सखोल अभ्यास आणि मेहनतीने तयार केलेल्या या प्रदर्शनाचे कौतुक केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सह-कोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सचिव लतीफ तांबोळी आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.