मिळालेल्या माहितीनुसार २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता बडनेरा रेल्वे स्टेशन ते टिळकनगर या रस्त्याच्या कडेला रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. मृताचे नाव अतुल ज्ञानदेव पुरी असे आहे. ही हत्या आर्थिक वादातून झाल्याची दाट शक्यता असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, सूत्रधार अद्याप पकडला गेला नसल्याने हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या हत्याकांडात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. दरम्यान, पोलिस उपायुक्त यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, बेकायदेशीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन मुलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.