अपघात इतका भीषण होता की परिसरात घबराट पसरली. सौंदलगाव, वाडीगोद्री आणि परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गाडीचे दरवाजे तोडून सर्वांना बाहेर काढले आणि पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात गाडी पूर्णपणे चुराडा झाली. या घटनेची नोंद गोंदी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून गोंदी पोलिस पुढील तपास करत आहे.