इराणने उपग्रह वाहून नेण्यास सक्षम असलेल्या आपल्या सिमोर्ग वाहनाने हे प्रक्षेपण केले. इराणच्या या प्रक्षेपणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्षेपणाला पूर्ण सावधगिरी बाळगली आहे. प्रक्षेपण इराणच्या सेमनान प्रांतातील इमाम खोमेनी स्पेसपोर्ट वरून करण्यात आले. प्रक्षेपणाच्या यशाची स्वतंत्रपणे पुष्टी केली नसून ते यशस्वी झाल्याचा दावा इराणने केला आहे. इराण ने अशा वेळी हे प्रक्षेपण जाहीर केले, जेव्हा इस्त्रायलचे गाझा पट्टीत हमास विरुद्ध सुरु असलेलं युद्ध आणि लेबनॉन मधील कमकुवत युद्धविराम करारामुळे पश्चिम आशियात तणाव वाढत आहे.