पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेकजण अडकल्याची भीती

Webdunia
रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (10:03 IST)
पुण्यामध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. या स्लॅबखाली काही जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पुण्याच्या बालेवाडीतील पाटील नगर याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा स्लॅब कोसळला. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांद्वारे बचावकार्याला तातडीनं सुरुवात झाली.
 
दरम्यान, स्थानिकांनी जखमींना लाइफलाइन रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. स्लॅबखाली अडकलेल्या इतरांना बाहेर काढलं जात आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख