मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर तीन महिन्यांनी श्रीनगरमध्ये लष्कराशी झालेल्या चकमकीत या हत्याकांडासाठी जबाबदार असलेले तीन संशयित पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहे. अशी माहिती समोर आली आहे. तीन परदेशी दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती सशस्त्र दलांना मिळाल्यानंतर श्रीनगरच्या दाचीगाम भागात ही चकमक सुरू झाली. लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफने ऑपरेशन महादेव नावाचा संयुक्त सराव सुरू केला. थोड्या वेळासाठी झालेल्या गोळीबारानंतर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दहशतवाद्यांना घेराव घातला आणि त्यांना ठार मारले. तसेच टीआरएफचे आणखी दहशतवादी अजूनही जंगलात लपले असल्याचा संशय आहे.
सोमवारी दाचीगाममध्ये शोध मोहिमेदरम्यान अचानक गोळीबार झाला, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. त्यानंतर, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि ऑपरेशन तीव्र केले.