22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून 26 जणांची निर्घृण हत्या केली होती. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांची ओळखपत्रे तपासली आणि नंतर ते हिंदू असल्याचे सांगत त्यांना गोळ्या घालून ठार मारले. 26 मृतांपैकी बहुतेक पर्यटक आहेत, तर दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिक आहेत.