शेटे यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आला. ते तणावाखाली असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले असून त्यानी असे टोकाचे पाऊल का घेतले याचा तपास पोलीस करत आहे. शेटे यांच्या निधनाने देवस्थान आणि प्रशासकीय वर्तुळात हळहळ केली जात आहे.