राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिंहगडावर

सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (19:44 IST)
देशात एक नवीन प्रकारची चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे ,तर या अवघ्या जगाचे 'हिरो'आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांचा अंत करून हिंदू साम्राज्याची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी,आणि शक्तीचा वापर करून राज्य केले.असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सिंहगडावर भेट दिल्यावर काढले.
 
राज्यपाल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज देशाचे अभिमान आणि स्वाभिमान आहे.आपण आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दलची माहिती आणि त्यांच्या बलिदानाबद्दलचे शिक्षण लहानपणापासून दिले पाहिजे.जेणे करून आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालसुरे सारखे व्यक्तिमत्त्व घडतील.
 
राज्यपाल कोश्यारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामास भेट दिली आणि माहिती घेतली.राज्यपालांनी नरवीर तानाजी मालसुरे आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन देखील घेतले.
 
या प्रसंगी आमदार भीमराव तापकीर,आमदार मुक्ता टिळक,राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील,पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने,उपविभागीय अधिकारी सचिन बारवरकर आणि सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्यपाल यांना सिंहगड आणि परिसराची सर्व माहिती डॉ.नंदकिशोर मते यांनी दिली.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती