शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार सोहळा,पंतप्रधानही राहणार उपस्थित

शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (09:30 IST)
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.आज शुक्रवारी पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी 11 वाजता हा सोहळा पार पडणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधणार आहेत.बाबासाहेबांनी ध्यास घेतलेला ‘शिवसृष्टी’ प्रकल्प साकारण्याचा संकल्प या निमित्तानं करण्यात येणार आहे. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

तिथीनुसार बाबासाहेब पुरंदरे 13 ऑगस्ट 2021रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा नागरी सत्कार, कोविड मर्यादांचे पालन करीत मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत होतआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमात व्हर्च्युअल सहभाग असेल.सुमित्रा महाजन,छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येईल. सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्रबुद्धे या गौरव समारंभात सहभागी असतील, अशी माहिती जगदीश कदम यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती