आसाम-मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे 6 जवान मृत्यूमुखी पडले होते. तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते.या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. काछरचे पोलीस अधिक्षक वैभव चंद्रकांत निंबाळकर यांना हिंसाचारात गोळ्या लागल्या होत्या.त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.आता त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.
वैभव निंबाळकर यांच्या पत्नी अनुजा निंबाळकर यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.फोटोमध्ये वैभव निंबाळक हे हॉस्पिटलमध्ये वॉकर घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत.त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रातील जनतेत आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राच्या या वीराने गोळ्या झेलून मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे. पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर हे सध्या मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वैभव निंबाळकर हे मुळचे पुणे जिल्ह्यातील (Pune district) इंदापूरचे (Indapur) रहिवासी आहेत. ते 2009 च्या IPS बॅचचे अधिकारी असून, भारतीय पोलीस सेवेत निवड झालेले ते सर्वात तरुण अधिकारी आहेत. आसाम केडर प्राप्त झाल्यापासून ते आसाममध्ये कार्यरत आहेत.