आणि राज ठाकरेंनी त्याला भाग्य लागतं असं म्हणत टोला लगावला

शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (15:27 IST)
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मंचावर भाषण करताना आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. आशिष शेलार यांनी जी रुपं सांगितली त्यामधील कलाकार रुप तुम्ही पाहिलं नसेल पण मी ते पाहिलं आहे. यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली असता राज ठाकरेंनी त्याला भाग्य लागतं असा टोला लगावला आहे. दरम्यान आशाताई ८८ वर्षांच्या असतानाही काय दिसतात ना अशी चर्चा लोकांमध्ये सुरु होती. पण मला वाटलं जाहीरपणे सांगावं असे राज ठाकरे यांनी म्हटले.
 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. राज ठाकरे यांनी कार्यक्रमात संवाद साधला आहे. यावेळी राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. तसेच बाबासाहेब पुरंदरेंबाबत एक किस्सा सांगताना आशिष शेलार यांना टोला लगावला आहे.
 
राज ठाकरे यांनी म्हटले कील,१९९५ साली त्या काळात ह्या शिवसृष्टीची जागा ही संस्थेला देण्यात आली होती. त्यावेळी या रस्त्यावर काही नसायचे, अनेक वर्षानंतर या शिवसृष्टीमध्ये आलो या शिवसृष्टीत येताना मला जुनी शिवसृष्टी आठवली जी बाबासाहेब यांनी १९७४ साली शिवतीर्थावर साकारली त्यावेळी मी ६ वर्षांचा होतो. कल्पना नाही पण रोज त्या शिवसृष्टीत जात असे आणि संध्याकाळचा एका राज्याभिषेक सोहळा रोज पाहायचो.चेंबूर अणुशक्तीनगर या भागामध्ये पहिल्यांदा त्या शिवसृष्टीत भवानी तलवार आणली गेली ती तलवार बाबासाहेब घेऊन आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असताना मी गेलो होतो. त्यावेळी पहिल्यांदा ६ वर्षाचा असताना मी बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला सर्वप्रथम पाहिले आणि तेव्हापासून आजपर्यंत पाहत होतो, ऐकत होतो त्यानंतर माझे भाग्य की भेटू शकलो त्यांच्या सहवासात राहून अनेक गोष्टी शिकू शकलो.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती