पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. बलुचिस्तानमधील मास्तुंग येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे ट्रेन रुळावरून घसरली. या घटनेत महिला आणि मुलांसह १० हून अधिक लोक जखमी झाले. ट्रेन क्वेटाहून पेशावरला निघणार होती. स्फोटानंतर सुरक्षा दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना आरोग्य केंद्रात नेले.
तसेच स्फोटाच्या वेळी २७० प्रवासी बसमध्ये असल्याची पुष्टी रेल्वेने केली. या वर्षाच्या सुरुवातीला, बलुचिस्तानच्या माच भागात जाफर एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये सहा लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता आणि ४५० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते.
वृत्तानुसार, मंगळवारी पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्यात आले. बलुचिस्तानमधील मास्तुंग येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे ट्रेन रुळावरून घसरली. या घटनेत महिला आणि मुलांसह १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ट्रेन क्वेटाहून पेशावरला निघणार होती. स्फोटानंतर सुरक्षा दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना आरोग्य केंद्रात दाखल केले.
पाकिस्तान रेल्वेच्या म्हणण्यानुसार, स्फोटानंतर जाफर एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले आणि एक उलटला. स्फोटावेळी २७० प्रवासी रेल्वेत होते याची पुष्टी रेल्वेने केली. रेल्वेला काही काळासाठी थांबवण्यात आले होते परंतु रुळांना कोणतेही नुकसान झाले नसल्याने सुरक्षा मंजुरीनंतर पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.
रेल्वे मंत्रालयाने या घटनेचा निषेध करत म्हटले आहे की, प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला, बलुचिस्तानच्या माच भागात जाफर एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये सहा लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता आणि ४५० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते.