भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ४ विकेट्सने जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला १२६ धावांचे लक्ष्य दिले. कांगारू संघाने हे लक्ष्य तुलनेने सहजतेने गाठले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १८.४ षटकात १२५ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १४ व्या षटकात हे लक्ष्य गाठले.
त्यानंतर भारताने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या आणि धावसंख्या ४९ झाली तोपर्यंत अर्धे भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर हर्षित राणा आणि अभिषेक शर्मा यांनी सहाव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. हर्षितने ३३ चेंडूत ३५ धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकार आणि एक षटकार होता. अभिषेक शर्माने ३७ चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकारांसह ६८ धावांची धमाकेदार खेळी केली. उर्वरित नऊ भारतीय फलंदाज एकेरी अंकी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, जोश हेझलवूडने सर्वाधिक तीन बळी घेतले.