महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि इतर राज्यातून लाखो 'वारकरी' या दिवशी पंढरपुरात जमतात. हा सण राज्यभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आषाढी एकादशीला अधिक खास बनवण्यासाठी एका शेतकऱ्याने एक शानदार पद्धत अवलंबली आहे.
शेतकऱ्याने आपल्या शेतातील रोपांच्या सहाय्याने विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पुण्यातील मुळशी तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकांचा वापर करून विठ्ठलाची प्रतिमा तयार केली आहे. हा शेतकरी पेशाने इंजिनिअरही असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्याने भातपिकांचा वापर करून शेतात विठ्ठलाची १२० फूट प्रतिमा तयार केली आहे.