महाराष्ट्रामध्ये आपल्या मित्रांसोबत मस्ती करतांना एका महिलेचा तोल गेल्याने ती थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली आहे व यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईमधील डोंबिवलीच्या विकास नाका परिसरातील आहे.
तिच्या सोबत एक व्यक्ती देखील खाली पडणार होता पण त्याने स्वतःला वाचवले. सध्या मानपाडा पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहे.