उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील एका सत्संग भवनाच्या सेवेदाराला दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली असून
अतिरिक्त पोलिस अधीक्ष यांनी सांगितले की, पीडितांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सायना कोतवाली परिसरात असलेल्या सत्संग इमारतीचा सेवक याला अटक करण्यात आली आहे.
तसेच दोन्ही पीडित 13 वर्षांच्या असून त्या एकाच गावातील रहिवासी आहे. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक किशोरवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तसेच सत्संग भवनच्या सेवेदाराने आपल्यावर अनेकदा अत्याचार केल्याचे मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या म्हणण्यानुसार, “पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.''