नाल्यात आढळले माय-लेकीचे मृतदेह

बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (11:39 IST)
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील मल्लनवा भागात मंगळवारी एका महिलेची आणि तिच्या चिमुरडीचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह शेतातील नाल्यात फेकून दिला व फरार झाले.  
 
मिळालेल्या माहितीनुसार माळवा पोलिस स्टेशन हद्दीतील गाझीपूर गावाजवळील सुरेंद्र पासवान यांच्या शेताच्या शेजारील एका नाल्यात एका महिलेचा आणि तिच्या मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आणि मुलीचा गळा चिरून हत्या करण्यात आली असून मृतदेहाची  ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. प्राथमिक तपासातून समजले की, महिलेचे वय अंदाजे 25 वर्षे असून चिमुरडी 6 महिन्यांची आहे. तसेच पोलीस पुढील तपास करीत हा आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती