तसेच भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणि त्यानंतर झालेल्या युद्धबंदीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही. वरिष्ठ नेत्याने सांगितले की हा एक संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे. त्यांनी अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीबद्दल केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' नंतरच्या विविध घडामोडींवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस, शिवसेना युबीटी यांच्यासह अनेक विरोधी पक्ष करत आहे. तर माजी संरक्षण मंत्री पवार म्हणाले की, या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. 'अशा विषयावर संसदेत चर्चा होऊ शकत नाही'. मुंबईत शरद पवार म्हणाले, "मी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विरोधात नाहीये. पण हा एक संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे आणि संसदेत इतक्या गंभीर विषयावर चर्चा करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रीय हितासाठी माहिती गुप्त ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याऐवजी सर्वपक्षीय बैठक घेणे चांगले होईल." असे देखील ते यावेळी म्हणाले.